
Photo : सम्राट क्लब नावेली अध्यक्ष आदित्य बिद्रे, सचिव स्वामिन पी. शिरोडकर, खजिनदार कमलेश कामत, कार्यक्रम समन्वयक नीता पाटील तसेच मंदिर समिती सदस्य परेश रावल आणि शैलेश शिरोडकर, नावेली सम्राट क्लबचे सदस्य आणि विजेते एकत्र.
नावेली : श्री लक्ष्मीनारायण मंदिर, डोंगरी नावेली येथे सम्राट क्लब नावेली यांच्या वतीने दीपोत्सव आणि दीपरंगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नावेली परिसरातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि दिवे लावून उत्सव साजरा केला.
दीपरंगोली स्पर्धेत १० स्पर्धकांनी सहभाग घेतला. कविशा देसाई यांना प्रथम बक्षीस मिळाले तर सची रावळ यांना द्वितीय बक्षीस आणि निर्मयी कामंळे यांना तृतीय बक्षीस मिळाले.

बक्षीस वितरण समारंभात क्लबचे अध्यक्ष आदित्य बिद्रे, मंदिर समितीतील सदस्य परेश रावल आणि शैलेश शिरोडकर यांनी विजेत्यांना पारितोषिके दिली, तसेच क्लबचे सचिव स्वामिन पी. शिरोडकर, खजिनदार कमलेश कामत आणि कार्यक्रम समन्वयक नीता पाटील व सम्राट क्लब नावेलीचे सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेचे निरीक्षण प्रिया बागी आणि दिनेश महाले यांनी केले. नावेलीमधील लोकांनी क्लबच्या या उपक्रमाची प्रशंसा करत यामुळे समुदायात एकता निर्माण झाल्याचे सांगित
