Spread the love

नावेली (गोवा) : सम्राट क्लब नावेली तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल सहा महिलांचा सन्मान करण्यात आला. नावेली पंचायत सभागृहात झालेल्या या सोहळ्यात पोलिस निरीक्षक सुदीक्षा नाईक, माजी पोलिस उपनिरीक्षक शोभा काणकोणकर, गोवा सरकारच्या लेखा संचालक फिलोमिना क्रुझ, शिक्षिका शशिकला कामत, पत्रकार व साहित्यिक कविता आमोणकर आणि निवृत्त मुख्याध्यापिका सरिता मळकर्णेकर यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

फोटो : सम्राट क्लब नावेली चे अध्यक्ष दिनेश महाले, संस्थापक आदित्य बिद्रे यांच्यासोबत मेलीफा कार्दोसो, पॉल परेरा व इतर मान्यवरांसोबत सन्मान मूर्ती

कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्या मेलिफा कार्डोझो प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर सरपंच पॉल परेरा, उपसरपंच वेलिंडा अफोन्सो व सचिव संदीप हल्याळी विशेष अतिथी होते. त्यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष दिनेश महाले, संस्थापक आदित्य बिद्रे, सचिव स्वामिनी शिरोडकर, खजिनदार दीपाली नाईक उपस्थित होते.

मेलिफा कार्डोझो यांनी स्त्री ही ऊर्जा व शक्तीचे स्वरूप असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्ष दिनेश महाले यांनी क्लबच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. या निमित्ताने नावेली व मडगाव परिसरातील महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना तेरानी यांनी केले तर आदित्य बिद्रे यांनी आभार मानले. यावेळी सम्राट क्लबचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

#InternationalWomensDay #SamratClubNavelim #GoaNews #WomenAchievers #InspiringWomen


Spread the love

By Sal TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *